
मुंबईत जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ात दिवसाला 20 हजारांचा टप्पा ओलांडलेली रुग्ण संख्या सहा हजारांच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अजून तीन ते चार दिवस तिसऱया लाटेचा प्रभाव किती राहील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यानंतरही रुग्ण संख्या आणखी कमी झाल्यास राज्य सरकारला शाळा सुरू करण्यासंदर्भात अहवाल देण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
सद्यस्थितीत सहा हजारांपर्यंत रुग्णनोंद होत आहे. मात्र अजूनही काळजी घेण्याची गरज असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर दर दोन दिवसांनी राज्य सरकार आणि टास्क फोर्ससोबत पालिकेची बैठक होत असून आढावा घेतला जात आहे.
राहत्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे लसीकरण
- मुंबईत 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला 3 जानेवारीपासून सुरुवात झाली. आतापर्यंत 1 लाख 65 हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
- 15 ते 18 वयोगटातील मुलांची संख्या 9 लाख 22 हजार 556 असून उर्वरित मुलांच्या लसीकरणासाठी राहत्या ठिकाणी लसीकरण क@म्प आयोजित करण्यात येतील.
- कॉलेज व परिसरात मागणीनुसार लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येईल, असेही काकाणी यांनी सांगितले. सध्या पालिका व शासकीय मिळून 351 लसीकरण केंद्रांवर डोस देण्यात येत असून विद्यार्थ्यांसाठी वेगळे बुथ ठेवण्यात येणार आहेत.



























































