अनुराधा कुबेर यांना ‘गानसरस्वती’ पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे दरवर्षी 50 वर्षे वयाखालील प्रथितयश हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायकाला ‘गानसरस्वती’ पद्मविभूषण किशोरी आमोणकर पुरस्कार देण्यात येतो. 2021 सालचा पुरस्कार भेंडी बाजार घराण्याच्या गायिका विदुषी अनुराधा कुबेर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार किशोरी आमोणकर यांचे शिष्य डॉ. अरुण द्रविड यांच्या वतीने देण्यात येतो. अनुराधा कुबेर यांनी भेंडी बाजार घराण्याचे ज्येष्ठ गायक टी. डी. जानोरीकर यांच्याकडे बरीच वर्षे तालीम घेतली. त्यानंतर संवादिनी वादक डॉ. अरविंद थत्ते यांच्याकडे त्यांची तालीम चालू आहे.