Nexzu मोबिलिटीने सादर केली Bazinga e-cycle, विना पेडल मारल्याशिवाय धावेल 100 किमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वदेशी इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनी Nexzu मोबेलिटीने आपली नवीन Bazinga e-cycle हिंदुस्थानात सादर केली आहे. ही सायकल सादर करताना कंपनीने सांगितलं की, Bazinga ब्रँडची नवीन सायकल पुढील महिन्यात लॉन्च होईल. याची प्रारंभिक किंमत 49,445 रुपयांपासून सुरू होईल. चला तर या सायकल बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ…

बिकिंग

तुम्हाला ही सायकल बुक करायची असल्यास तुम्ही कंपनीच्या अधिकृत संकेत स्थळाला किंवा कंपनीच्या सोशल मीडीयाच्या माध्यमातून याची प्री-बुकिंग करू शकता. Nexzu ने म्हटले आहे की, ही सायकल लाॅन्च केल्यानंतर बाजारात येताच याची डिलिव्हरी सुरू केली जाईल. या सायकलच्या कार्गो व्हेरिएंटची किंमत 51,525 रुपये ठेवण्यात आली असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

रेंज

Bazinga सायकलची रेंज वाचून तुम्ही खुश व्हाल. कंपनीने दावा केला आहे की, ही इलेक्ट्रिक सायकल सिंगल चार्जमध्ये 100 किमीचा पल्ला गाठण्यात सक्षम आहे. याचाच अर्थ असा की, एकदा तुम्ही ही सायकल फुल्ल चार्ज केल्यावर विना पेडल मारता 100 किमीचा प्रवास करू शकता. कंपनी यात लि-आयन बॅटरी दिली आहे.