कोरोनापासून देशाची सुटका करणार नागीण! प्रोमो पाहून प्रेक्षकांची सटकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावर गाजलेल्या नागीन या मालिकेचा सहावा सिझन प्रदर्शित होणार आहे. त्याचा प्रोमो नुकताच प्रसारित करण्यात आला. तो पाहून प्रेक्षक प्रचंड वैतागले आहेत.

प्रोमोत दाखवल्यानुसार, 2020मध्ये शेजारी देशाने एक जीवघेणा विषाणू आपल्या देशावर सोडला आहे. या विषाणूपासून ‘नागिन’ सगळ्यांचं संरक्षण करणार आहे. यावेळी स्वतःसाठी नव्हे तर देशासाठी बदलणार आहे ‘नागिन’. असं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. या प्रोमोत एक टॅगलाईनही देण्यात आली आहे. विषच विषाला मारतं, अशा अर्थाची ती ओळ आहे.

कलर्स टीव्हीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. जवळपास 52 सेकंदांच्या या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. त्या खाली प्रेक्षकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोनासारख्या विषाणूशी नागिणीचा लढा ही संकल्पनाच अनेकांना हास्यास्पद वाटत आहे. तर मालिकांमध्ये काय वाट्टेल ते दाखवण्यात येत असल्याने प्रेक्षकही आता वैतागले आहेत. अनेकांनी या व्हिडीओखाली ही जर देशप्रेमी नागीण असेल तर तिच्या विषापासून बुस्टर डोस बनवण्यासाठी याचिका दाखल करा, असा उपहासात्मक टोलाही लगावला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)