व्हॉटस्ऍप होणार आणखी सुरक्षित, डेस्कटॉप ऍपसाठी सिक्युरिटी पिन मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सऍप सध्या दोन नवीन फीचरवर काम करत आहे. एक सिक्युरिटी फीचर तर दुसरे फीचर व्हॉईस कॉलच्या वॉलपेपरचे आहे. एका अहवालानुसार, डेस्कटॉप ऍपसाठी व्हॉट्सऍपमध्ये दोन स्टेप वेरिफिकेशन फीचर येणार आहे. या अंतर्गत युजरला पिन नंबर देण्यात येईल. त्या पिन नंबरच्या सहाय्याने इनबेल आणि डिसेबल करण्याचा पर्याय मिळेल. सध्या या फीचरची चाचणी बीटा व्हर्जनवर सुरू आहे. त्यानंतरच डेस्कटॉपवर हे फीचर उपलब्ध होईल. दुसऱया फीचरमुळे व्हॉईस कॉलमध्ये वॉलपेपर ‘कस्टमाईज’ करण्याचा पर्याय मिळेल. सध्या व्हॉईस कॉल करताना फक्त ‘डिफॉल्ट’ वॉलपेपर दिसत आहे. अलीकडेच व्हॉट्सऍपने व्हॉईस मॅसेजची प्रीह्यू फीचर जारी केलेले आहेत.