…म्हणून ‘येथे’ प्रत्येक वर्षी रेल्वे रुळांना लावली जाते आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे ही कोणत्याही देशाची लाईफलाईन समजली जाते. वादळ, पाऊस, बर्फवृष्टी सुरू असतानाही रेल्वे आपला रस्ता कापत असते. माणसांसह जीवनाश्यक वस्तूची वाहतूक करण्याचे काम रेल्वे करते. त्यामुळे कोणत्याही ऋतुत ही रेल्वे सुरू राहणे हिताचे असते. यासाठी प्रत्येक देशातील सरकार कसोशीने प्रयत्न करते.

सोशल मीडियावर सध्या रेल्वे रुळांना आग लावल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अमेरिकेतील शिकागो येथील (Chicago) हे व्हिडीओ असून येथे दरवर्षी रेल्वे रुळांना आग लावली जाते. सुरुवातीला हा कोणत्या तरी आंदोलनाचा भाग असावा असे आपल्याला वाटेल, परंतु यामागील कारण वेगळे आहे.

शिकागोमध्ये प्रत्येक वर्षी कडाक्याची थंडी पडते. रक्त गोठवणाऱ्या थंडीमध्ये सर्व काही गोष्टी गोठल्या जातात. रेल्वे रुळदेखील थंडीमुळे गोठला जातो. अशा स्थितीत लोकांना सुरक्षित प्रवास करता यावा म्हणून रेल्वे रुळांना आग लावली जाते. ट्रान्सपोर्ट ऑपरेटर मेट्रा हे काम येथे करते.

रेल्वे रुळ हे स्टील या धातूपासून बनलेले असतात आणि उणे तापमान असणाऱ्या या ठिकाणी रेल्वेरुळ आकुंचन पावतात. यामुळे रेल्वेचा वेग कमी होता, तसेच यामुळे अपघात होण्याचीही शक्यता वाढते. त्यामुळे रेल्वे रुळांचे तापमान शून्याहून अधिक ठेवण्यासाठी यावर आग लावली जाते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)