शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे माजी खासदार गजानन धरमसी बाबर यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (दि. 2) दुपारी खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेच्या स्थापनेपासून तळागाळात शिवसेना रुजविण्यापर्यंत बाबर यांचे मोठे योगदान होते. त्यांच्यामागे पत्नी राजश्री, उद्योजक धीरज बाबर आणि सूरज बाबर ही दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक मधुकर बाबर, प्रकाश बाबर हे त्यांचे बंधू, तर माजी नगरसेविका शारदा बाबर या भावजय आहेत.

पोटाच्या विकारामुळे बाबर यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेले तीन महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. दुपारी चारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे कृत्त समजताच पिंपरी-चिंचवड शहरात शोककळा पसरली.

जनसेवेचा आदर्श उभा करणारे व्यक्तिमत्त्व, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रद्धांजली

समाजकारण आणि राजकारण यांचा समतोल साधत जनसेवेचा आदर्श उभा करणारे धडाडीचे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार गजानन बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, दिवंगत गजानन बाबर यांनी मेहनतीच्या जोराकर राजकारणात स्थान निर्माण केले. नगरसेवक, आमदार आणि खासदार म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटकला. विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यातून त्यांनी समाजकारणाचा आदर्श उभा केला.