पालिका शाळांमध्ये आता खगोलशास्त्र प्रयोगशाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या शाळांमध्ये आता खगोलशास्त्राrय प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आकाश संशोधन व जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात येणाऱया या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात 25 शाळांमध्ये अशी प्रयोगशाळा सुरू करण्यात येईल. वरळी सी फेस पालिका शाळेत पहिली अॅस्ट्रॉनॉमी लॅब तयार करण्यात आली असून लवकरच ती सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सहआयुक्त अजित पुंभार यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या पहिली ते बारावीपर्यंतच्या 1159 शाळा असून सुमारे तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, उर्दू, गुजराती अशा आठ माध्यमाच्या शाळा आहेत. या विद्यार्थ्यांना पालिकेकडून 27 शालेय वस्तू मोफत दिल्या जातात. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि अद्ययावत शिक्षण देण्यासाठी डिजिटल क्लासरूम, टॅब अशा सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात. तर आगामी काळात आणखी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे.

असा राबवणार उपक्रम

 पहिल्या टप्प्यात 25 शाळांमध्ये खगोलशास्त्र प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार. यानंतर लोकसहभाग, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने संख्या वाढवण्यात येईल.
 यामध्ये टेलिस्कोपसह विद्यार्थ्यांच्या वयानुसार वापरता येणारी अभ्यास साधने, यंत्रे उपलब्ध करण्यात येतील.
 यामुळे विद्यार्थी रात्री आणि दिवसाही उघडय़ा डोळ्यांनी साधनांच्या सहाय्याने खगोलशास्त्राचा अभ्यास करू शकणार.
डिजिटल क्लासरूम अद्ययावत होणार
 पालिकेच्या दादर येथील स्टुडिओत रेकॉर्डिंग केलेल्या अभ्यासक्रमाचे, तज्ञ शिक्षकांच्या लेक्चरचे व्हिडीओ ‘यू टय़ूब’वर उपलब्ध करण्यात येतात. या स्टुडिओसह शाळांमध्ये असणाऱया डिजिटल क्लासरूममधील दहा वर्षांपूर्वीची मशिनरी बदलून त्यांचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.
 ‘प्री-लोडेड’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान आणि गणिताचा अभ्यासक्रम परिणामकारकरीत्या शिकवण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पुंभार यांनी सांगितले.

पालिकेच्या शाळांत सद्यस्थितीत विज्ञान विषयासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषयाचे साहित्य असलेल्या प्रयोगशाळा आहेत, मात्र खगोलशास्त्राची प्रयोगशाळा नाही. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
 अजित कुंभार, सहआयुक्त