कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कळंब तालुका पत्रकार संघाच्यावतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. राज्यस्तरीय प्रशासकीय सेवा रत्न पुरस्कार डॉ. निशिकांत देशपांडे यांना तर शकुंतला देशपांडे स्मृती समाजसेवा पुरस्कार सोलापूरच्या प्रार्थना फाऊंडेशनचे संचालक प्रसाद विठ्ठल मोहिते यांना जाहीर झाला आहे. ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दै. ‘लोकसत्ता’चे बीड जिल्हा प्रतिनिधी वसंत मुंडे यांना जाहीर झाला आहे तर के.ए.जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद कन्या प्रशाला क. तडवळे येथील जगन्नाथ धायगुडे यांना देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.