INDvsWI टीम इंडियाने वेस्ट इंडिजला नमवले, मालिकाही 2-0 ने जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका खिशात टाकली आहे. रोहीत ब्रिगेडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 44 धावांनी पराभव केला.

टॉस जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीपुढे टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकल्या. टीम इंडियाचे अवघ्या 43 धावात टीम इंडियाच्या 3 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर सुर्यकुमारने अर्धशतक करत टीम इंडियाचा डाव सावरला. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला 238 धावांचे लक्ष्य दिले. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचा डाव 46 षटकात 193 वर आटोपला.