
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या परीक्षा यंदा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची घोषणा बोर्डाकडून करण्यात आली आहे. त्यानुसार दहावी-बारावीच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा 26 एप्रिलपासून घेतल्या जाणार आहेत. देशात कोरोना महामारी नियंत्रणात आल्यामुळे राज्य बोर्डप्रमाणे केंद्रीय शिक्षण मंडळदेखील ऑफलाइन परीक्षेची तयारी करत आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.



























































