
महिला पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी सिद्धार्थ श्रीवास्तव याला मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली. त्याने धमकी नेमकी कशासाठी दिली होती, त्याचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. तक्रारदार महिला पत्रकाराला गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर धमक्या येत होत्या. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनंतर मुंबई सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. धमकीचा मेसेज पाठवणाऱ्यांची माहिती समजताच पोलिसांचे पथक भोपाळला गेले. तेथून पोलिसांनी सिद्धार्थला ताब्यात घेतले. सिद्धार्थने पोलिसांना गुह्याची कबुली दिली. सिद्धार्थच्या चौकशीत काही जणांची नावे समोर आली आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.

























































