खराखुरा सुपरहीरो! 15 सेकंदात सर केली तीन मजली इमारत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होतात. काही मजेशीर व्हिडीओ आपल्याला खळखळून हसवतात तर काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देतात. सध्या असाच एक प्रेरणादायी व्हिडीओ चर्चेत आला आहे. बुल्गारियातील एका फायर फायटरचा हा व्हिडीओ आहे. अग्निशमन दलात काम करणाऱ्या जॉर्ज यांचा वेग पाहून युजर्सनी त्याला खराखुरा सुपरहीरो असे म्हटले आहे. व्हिडीओमध्ये जॉर्ज हातात शिडी घेऊन वेगाने इमारतीच्या दिशेने धावताना दिसतोय. विशेष म्हणजे, तीन मजली इमारत त्याने अवघ्या 15 सेकंदांत सर केली आहे. आतापर्यंत 50 लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून जॉर्जच्या शौर्याला सलाम केला आहे.