शेतकरी पुत्राची चक्क ट्रॅक्टर वरून काढली वरात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामनी येथे एका शेतकरी पुत्राने वरात ट्रॅक्टरवरून काढली. मुलगा काम शेती करतो म्हणून नवरदेवाची गाडी म्हणून चक्क वडस्कर यांनी शेतीची मशागत करणारा ट्रॅक्टर आणला व त्यावरूनच वरात काढली. शुभम वडस्कर असे त्या शेतकरी पुत्राचे नाव असून त्याचा विवाह रविना रेकलवार हिच्याशी मोठ्या थाटात पार पडला. या विवाहाची चर्चा पंचक्रोशीत होत असून ट्रॅक्टरवरील वरातीचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत.