
शिवसेनेचे कुंडलिक खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालूक्यातील म्हाळस जवळा येथील सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. म्हाळस जवळा सेवा सहकारी सोसायटी सलग चौथ्यांदा शिवसेनेच्या ताब्यात आली आहे. या सोसायटीमध्ये भाजप, शिवसंग्राम आणि राष्टवादीला उमेदवारही मिळाले नाहीत.
बीड तालुक्यातील म्हाळसा जवळा येथील ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीत म्हाळसा जवळा सेवा सहकारी सोसायटीच्या 14 संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. यामध्ये कुंडलिक खांडे, महादेव खांडे, नवनाथ खांडे, कुंडलिक गणपती खांडे, शिवाजी खांडे, कल्याण खांडे, कबीर खांडे, श्रीराम कदम, भोज लक्ष्मी, नंदा राऊत, दामोदर राऊत, वैजीनाथ ढोरमारे, अर्जुन फसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सचिव म्हणून कांताराव डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेनेचे कुंडलिक खांडे म्हणाले की, गेल्या 15 वर्षापासून म्हाळस जवळ्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. गावात सर्व मुलभूत सुविधा नागरिकांना प्रदान करण्यात आल्या आहेत. गावाला आत्मनिर्भर करण्यासाठी शासकीय पातळीवर जे प्रयत्न आवश्यक आहेत, ते सर्व करणार आहोत. शासनाच्या सर्व योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळण्यासाठी आणि दिनदुबळ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी त्यांना सक्षम करण्याकडे आमचा कल असेल असे कुंडलिक खांडे म्हणाले.
सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असणार्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील सर्वात आदर्शवत सेवा सहकारी संस्था म्हणून आम्ही नावलौकिक मिळवू. सलग चौथ्यांदा म्हाळस जवळा सेवा सहकारी सोसायटीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ग्रामस्थांनी दाखवलेल्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी शिवसेना तालूका प्रमुख गोरख सिंघन, देवराव घोडके, गणेश खांडे, लहू खांडे, हरिभाऊ खांडे, आदिनाथ खांडे, ईश्वर खांडे, महादेव खांडे अप्पा, शिवाजी खांडे, विष्णू भोज, रामनाथ खांडे, बाबा राऊत, पंडित खांडे, कल्याण बप्पा खांडे, बाबु खांडे आदिसह यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























































