
महिलांना आकर्षित करण्यासाठी काय करावं, त्यांच्याशी कसं बोलावं याचे धडे देण्याचं काम एका मॉडेलने स्वीकारलं आहे. या कोचिंग क्लासच्या माध्यमातून ती तरुणांना याबाबत मार्गदर्शन करत आहे.
या मॉडेलचं नाव केजिया नोबेल असं आहे. ती डेटिंग आणि अॅट्रेक्शन एक्सपर्ट आहे. तरुणांना महिलांशी बोलण्यासाठी आत्मविश्वास मिळवून देणं, त्यांना महिलांशी बोलण्याच्या पद्धती शिकवणं तसंच डेटिंगसाठी उत्सुक असलेल्या तरुणांना योग्य मार्ग दाखवणं, अशी कामं ती करते.
View this post on Instagram
हाच तिचा व्यवसाय आहे. केजिया 2006मध्ये वयाच्या 25व्या वर्षी अचानकच या व्यवसायात आली. एका बारमध्ये बसलेली असताना एका बूटकँप चालवणाऱ्या माणसाने तिला सिंगल मुलांशी चॅटिंग करण्याची ऑफर दिली. या बूटकँपमध्ये तो माणूस तरुणांना महिलांशी आत्मविश्वासाने संभाषण करण्याबाबत मार्गदर्शन करत होता.
View this post on Instagram
त्यावरून तिलाही अशा व्यवसायाची कल्पना सुचली. तिने व्यक्तिमत्व विकासासाठी वेगळे कोचिंग क्लास घ्यायला सुरुवात केली. या कोचिंगमध्ये ती तरुणांना महिलांशी संवाद कसा साधावा, काय बोलावं, किती आत्मविश्वास असावा, यासंबंधी मार्गदर्शन करते. केजियाचं स्वतःचं यूट्युब चॅनलही आहे. सध्या तिच्याकडे 25 जणांचा चमू आहे, जो तिला तिच्या कामात मदत करतो. तिची आतापर्यंतची कमाई 10 कोटींहून अधिक आहे. ती एका तासाच्या कोचिंगचे तीस हजार रुपये आकारते.
View this post on Instagram



























































