महावितरणचे कधीही खासगीकरण होणार नाही;  ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याच्या कानाकोपऱयात वीज पोहचवणाऱया महावितरणचे कदापि खासगीकरण होणार नसल्याचे मत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केले आहे. तसेच खासगीकरणाबाबत राज्य सरकारच्या समोर कोणताही प्रस्ताव नाही, मात्र भाजप केवळ राजकीय फायद्यासाठी खासगीकरणाच्या वावडय़ा उठवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

केंद्रातील भाजप सरकार वीज कंपन्यांचे खासगीकरण करण्यासाठी 2014 पासून प्रयत्न करत आहे. त्यासाठी 5 ते 6 वेळा विद्युत कायद्यात सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत. स्टँडर्ड बिडिंग डॉक्युमेंट राज्यावर लादून आडमार्गाने खासगीकरणाचा प्रयत्नही केंद्राने करून पाहिला आहे. मात्र राज्य सरकारच्या वतीने ऊर्जामंत्री म्हणून मी त्याला कडाडून विरोध केला आहे. तसेच महावितरणच्या खासगीकरणासाठी भाजपने राज्यात सत्तेत असताना अनेकदा प्रयत्न केला आहे. त्यासाठीच त्यांनी वीज बिलाची थकबाकी तिपटीने वाढू दिली. मात्र त्यामध्ये ते अपयशी ठरल्यानेच सध्या भाजप खासगीकरणाच्या वावडय़ा उठवत असल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात भाजप सत्तेत असतानाच त्यांनी महानिर्मितीच्या नफ्यात चालणाऱया जलविद्युत प्रकल्पाचे खासगीकरण केले आहे. मात्र आज तेच भाजपवाले खासगीकरणाबाबत खोटा प्रचार करत असल्याचा आरोप ऊर्जामंत्र्यांनी केला आहे.