विधानसभा निवडणुकांमध्ये 40 स्टार प्रचारकांना मुभा, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोरोनाचा संसर्ग ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने रविवारी मोठा निर्णय जाहीर केला. आयोगाने पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमधील स्टार प्रचारकांच्या संख्येवरील बंधन शिथील केले आहे. त्यानुसार राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना विधानसभा निवडणुकीमध्ये 40 तर इतर पक्षांना 20 स्टार प्रचारक ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. देशात कोरोनाचा फैलाव वाढल्यानंतर स्टार प्रचारकांच्या संख्येला निवडणूक आयोगाने कात्री लावली होती.

नव्या निर्णयानुसार, राजकीय पक्षांना अतिरिक्त स्टार प्रचारकांची यादी 23 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निवडणूक आयोगाकडे सादर करता येणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना सूचना केल्या आहेत. देशात सध्या कोरोनाच्या सक्रीय तसेच नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. त्या अनुषंगाने सरकारनेही संसर्ग रोखण्यासाठी लादलेले निर्बंध हळूहळू हटवले आहेत. त्याबाबत योग्य विचारविनिमय केल्यानंतर निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांच्या संख्येवरील बंधन शिथील करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

z आयोगाने ऑक्टोबर 2020 मध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या स्टार प्रचारकांची संख्या 40 करून 30 पर्यंत कमी केली होती. तसेच इतर राजकीय पक्षांसाठी स्टार प्रचारकांची कमाल संख्या 20 करून 15 पर्यंत खाली आणण्यात आली.
z कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोठय़ा प्रमाणावर गर्दीत सभा घेतल्या गेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने स्टार प्रचारकांची संख्या कमी केली होती.