
वाघ बिबट्यांना अस्वल बघायचं असेल तर जंगलात जावं लागतं किंवा एखाद्या अभयारण्यात जावं लागतं. चंद्रपुरात चित्र जरा वेगळेचं आहे, जंगलातील हे हिंस्त्र प्राणी आधी गावात यायचे आता थेट शहरात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या भितीतून शहरवासीय अद्याप सावरले नसताना अस्वलाने महामार्गावर पाऊल टाकले.
या मादी अस्वलाचा रोड शो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे रस्ता ओलांडून जाताना अस्वलाने घेतलेली लांब उडी चर्चेत आहे. नागपूर चंद्रपूर महामार्गावरील वडगाव चौकी परिसरातील रोडवर रात्री हे अस्वल फिरताना आढळलं. एक चार चाकी वाहनधारकांने अस्वलाचे व्हिडिओ बनवत मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत व्हायरल केलं आहेत.
View this post on Instagram





























































