सोलापूरकरांचा रेल्वेप्रवास होणार वेगवान, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात वाशिंबे ते भाळवणीदरम्यान दुहेरीकरणाचे काम पूर्ण होताच झिरो बेस टाईम टेबलची अंमलबजावणी होणार असून, यानंतर नव्या गाडय़ा धाकवणार आहेत. वेग जास्त, थांबे कमी होणार असल्याने सोलापूरकरांचा प्रकास वेगवान होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी दिली.

महाव्यवस्थापक लाहोटी यांनी सोलापूर विभागाचा वार्षिक निरीक्षण दौरा केला. अंकाई ते कोपरगावदरम्यान ताशी 130 किलोमीटर वेगाने येऊन निरीक्षण दौऱयाची सुरुवात करण्यात आली. सोलापूर विभागाच्या स्थानकावरून सोलापूर मुंबईदरम्यान धावणारी इंद्रायणी (इंटरसिटी) एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेससह इतरही मेल, एक्सप्रेससह पॅसेंजर गाडय़ा मार्चनंतर सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महाव्यवस्थापक लाहोटी यांनी दिली.

लाहोटी यांनी शुक्रवारी मनमाड-दौंड सेक्शनचा वार्षिक निरीक्षण दौरा केला. त्याचबरोबर वाशिंबे-भाळवणीदरम्यान दुहेरीकरणाच्या आणि विद्युतीकरणाच्या कामाची पाहणीदेखील केली. यावेळी सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश गुप्ता, प्रधान मुख्य परिचालन प्रबंधक मुकुल जैन, मुख्य काणिज्य प्रबंधक प्रभात रंजन, प्रधान मुख्य यांत्रिक इंजिनीअर ए. के. गुप्ता, प्रधान मुख्य इलेक्ट्रिक इंजिनीअर गोपाल चंद्रा, प्रधान मुख्य इंजिनीअर अश्विनी सक्सेना, प्रधान मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. ए. के. सिन्हा, अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार, वरिष्ठ किभागीय परिचालन व्यवस्थापक ए. एल. रणयेवले, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय विद्युत इंजिनीअर अनुभव वर्षणय, रेल्वे सुरक्षा आयुक्त श्रेयस चिंचवाडे, मध्य रेल्केचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाव्यवस्थापक लाहोटी यांचे सोलापूरला आगमन झाल्यानंतर त्यांनी स्थानकावर उभारण्यात आलेल्या कोचिंग डेपो आणि सेल्फ प्रोफाइल ऑक्सिडेंट रिलीफ ट्रेनची अर्थात (आपत्कालीन सेवा यानची) पाहणी केली. त्यानंतर वातानुकूलित प्रतीक्षालय, ड्रायक्हर लॉबीचीदेखील पाहणी केली. सोलापूर येथे लाहोटी यांना श्री जंगम समाज बहुउद्देशीय संस्था दुधनी यांच्या कतीने कलबुर्गी- कोल्हापूर व सिकंदराबाद-हुबळी एक्सप्रेस गाडीला दुधनी येथे थांबा देण्यात यावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले.