
आंध्र प्रदेशात गुंटुर येथे राहणाऱ्या ज्योती कोठा या दगडातून अनोख्या कलाकृती साकारतात. गारगोटी आणि दगडांतून त्यांनी तयार केलेल्या कलाकृतींना चांगली मागणी आहे.
पेबल आर्ट म्हणजे दगडांपासून कलाकृती तयार करणे. ही कला पाश्चात्य देशांमध्ये लोकप्रिय आहे. आपल्याकडे मात्र हवा तसा या कलेचा प्रसार झालेला नाही. कलावंत दगडांना न कापता आहे त्याच आकारातून कलाकृती तयार करतात. ज्योती कोठा या मागील सहा-सात वर्षांपासून पेबल आर्टचे काम करत आहेत. या कलाकृती तयार करण्यासाठी त्यांना 10 ते 15 दिवसांचा कालावधी लागतो. आतापर्यंत त्यांनी 200 हून अधिक पेबल आर्ट कलाकृती केल्या आहेत.





























































