
मोबाईलवर गेम खेळताना जाहिरात येते. त्यामुळे गेम खेळता-खेळता अनेकांची चिडचिड होते. मात्र आता गुगलने आपल्या ग्राहकांना खास सुविधा दिली आहे. त्यामुळे गेम खेळताना जाहिराती येणार नाहीत. गुगलने प्ले स्टोअरवर ‘प्ले पास’ नावाने एक विभाग सुरू केला आहे. त्यामुळे गेम खेळताना जाहिरातीपासून सुटका होईल. गुगलची ही सेवा मोफत नसून, त्यासाठी ग्राहकांना पैसे मोजावे लागणार आहेत. गुगलने सुरू केलेल्या नव्या सेवेत जंगल ऍडव्हेंचर्स, वर्ल्ड क्रिकेट बॅटेल यासारखे गेम आहेत.






















































