
झी मराठी ’बँड बाजा वरात’ नावाचा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. ज्यात नवदाम्पत्यांना झी मराठीकडून आहेर मिळणार आहे. या कार्यक्रमाचे स्वरूप अद्याप उलगडलं नसून झी मराठीच्या सोशल मीडियावर नुकतंच या कार्यक्रमाचा एक प्रोमो रिलीज केला आहे. ’लग्न वाजतंय घरात, मांडव सजला बाहेर ओळख पाहू कोण घेऊन येणार, झी मराठीचा आहेर?’ असं म्हणत प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक कोण आहे याचं कोडं वाहिनीने घातलं आहे. या कोडय़ाचं उत्तर देखील प्रेक्षकांनी कमेंट सेक्शनमध्ये दिलं आहे. बहुतांश प्रेक्षकांनी अभिनेता पुष्कराज चिरपुटकरचे नाव घेतले आहे. आता हे उत्तर बरोबर आहे की चूक हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.























































