
टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात उद्यापासून (दि. 4) कसोटी क्रिकेट मालिकेस प्रारंभ होणार आहे. मात्र या मालिकेपेक्षा सध्या हिंदुस्थानचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या शंभराव्या कसोटी सामन्याची जोरादार चर्चा सुरू आहे. विराटही आपली कारकिर्दीतील शंभरावी कसोटी संस्मरणीय ठरविण्यासाठी कुठलीच कसर सोडणार नाही, एवढे नक्की. त्यामुळे त्याच्या तमाम चाहत्यांना शुक्रवारपासून सुरू होणाऱया हिंदुस्थान-श्रीलंकेदरम्यान होणाऱया सलामीच्या कसोटी सामन्याची उत्पंठा लागली आहे.
हिंदुस्थानने 1932 साली पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर टीम इंडियामध्ये अनेक दिग्गज क्रिकेटपटू नाव गाजवून गेले. सुनील गावस्कर यांची 10 हजारी कसोटी धाव असो पिंवा सचिन तेंडुलकरचा भावनिक निरोप हे क्षण ‘याचि देही याचि डोळा’ बघण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी तुडुंब गर्दी केली होती. विराट कोहलीच्या शंभराव्या कसोटीसाठीही चाहत्यांची उत्पंठा टिपेला पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोहालीच्या मैदानावर 50 टक्के प्रेक्षकांनाच परवानगी असली तरी कोहलीची शंभरावी कसोटी संस्मरणीय ठरविण्यासाठी ‘बीसीसीआय’नेही पंबर कसली आहे.
शतकी कसोटीला शतकाचा टिळा लागो
टीम इंडियाचा ‘रन मशीन’ असलेल्या विराट कोहलीच्या बॅटमधून गेल्या दोन वर्षांपासून शतक झळकलेले नाही. त्यामुळे शंभराव्या कसोटीत तरी विराटच्या खेळीला शतकाचा टिळा लागो, यासाठी चाहत्यांनी आतापासून देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. सुरंगा लकमल, लाहिरू कुमारा व लेसिथ एम्बुलडेनिया या गोलंदाजी ताफ्यापुढे खेळताना विराटला काही त्रास होईल असे वाटत नाही. श्रीलंकेविरुद्ध विराटची मागील कामगिरी बघता त्याचा शतकाचा दुष्काळ संपू शकेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
अनुभवी खेळाडूंवर श्रीलंकेची मदार
हिंदुस्थान दौऱयावर आलेल्या श्रीलंका संघाची मदार कर्णधार दिमुथ करुणारत्ने, दिनेश चंडीमल व अँजेलो मॅथ्यूज या अनुभवी क्रिकेटपटूंवर असेल. फिरकीला अनुकूल असलेल्या मोहालीच्या खेळपट्टीवर रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा या दर्जेदार फिरकीच्या जोडगोळीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजीचा खऱया अर्थाने कस लागणार आहे.
रोहितच्या नेतृत्वाची कसोटी
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील रोहित शर्माचे नेतृत्व आता अधोरेखित झाले आहे. आता त्यांच्या कसोटी नेतृत्वाची खरी कसोटी असणार आहे. 34 वर्षीय रोहितला प्रथमच कसोटी संघाचे कर्णधारपद मिळालेले आहे. संक्रमण अवस्थेत असलेल्या टीम इंडियाला कर्णधार या नात्याने रोहित कसा पुढे घेऊन जातो, हे बघणे मोठे रंजक ठरणार आहे. कारण चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे व इशांत शर्मा या अनुभवी खेळाडूंना बाहेर बसवून नव्या दमाचे खेळाडू रोहितच्या दिमतीला दिलेले आहेत. पुजाराच्या तिसऱया क्रमांकावर शुभमन गिलला संधी मिळण्याची शक्यता आहे. रहाणेच्या पाचव्या क्रमांकावर हनुमा विहारी पिंवा श्रेयस अय्यर यापैकी एकाला संधी मिळू शकते. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतही पाचव्या क्रमांकाचा दावेदार आहे.
उभय संघ
हिंदुस्थान – रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टिरक्षक), हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयंत यादव, श्रेयस अय्यर, कोना भारत (यष्टिरक्षक), उमेश यादव, सौरभ कुमार, प्रियांक पांचाल.
श्रीलंका – दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, चरित असलंका, दुशमंथा चमीरा, दिनेश चांडीमल, एंजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, लसिथ एम्बुलडेनिया, विश्व फर्नांडो, सुरंगा लखमल, लाहिरू थिरिमाने, लाहिरु कुमारा, कुसाल मेंडिस, पाथुम निसांका, जेफ्री वंडारसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने.





























































