विधान परिषदेत आज 260 अन्वये प्रस्तावावर चर्चा सुरू असताना उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी सर्व सदस्यांना महिलांच्या प्रश्नांवर बोलताना संवेदनशीलता पाळण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, गुह्याशी संबंधित कोणत्याही महिलेच्या नावासंदर्भात जाहीर वाच्यता होणार नाही तसेच अत्याचाराच्या तपशिलावर बोलताना विवेक, संयम आणि कायद्याची चौकट अबाधित राहील, याबाबत आवश्यक तेवढेच भाष्य करण्याची खबरदारी घ्यावी. यामुळे सर्व तक्रारदार महिला, संबंधित घटनेशी संबंधित महिला आणि सर्वच घटक निर्धास्तपणे आपली भूमिका करू शकतील, असे प्रतिपादन डॉ. गोऱहे यांनी केले आहे.





























































