
न्यूयॉर्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. चित्र पाहायला मनाई केल्याने एका माथेफिरु चाहत्याने न्यूयॉर्कच्या म्युझिअम ऑफ मॉर्डन आर्ट दोघांना भोसकल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ माजली असून आरोपीला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली आहे.
न्यूयॉर्क पोलीस विभागाने आरोपीची ओळख पटवून त्याचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. त्याची ओळख पटली असून गॅरी कॅबाना असे या माथेफिरु चाहत्याचे नाव आहे. चित्रकार व्हॅन गॉग यांचे ‘स्टारी नाईट’ हे प्रसिद्ध पेण्टिंग पाहण्यासाठी आला होता. दरम्यान त्या गॅरी यांचे म्युझिअमचे सभासदत्व संपले असल्याने नियमाप्रमाणे त्यांना आत जाण्यासाठी रोखण्यात आले. चित्र बघण्यासाठी रोखल्याने संतापलेल्या चाहत्याने आर्ट गॅलरीच्या दोन कर्मचाऱ्यांना भोसकले. याप्रकरणी पोलिसांनी गॅरीला अटक केली आहे.
60 वर्षांचे गॅरी आपली बाजू स्पष्ट करताना म्हणाले की, यात आपला काही दोष नसून चित्र गॅलरीच्या कर्मचाऱ्यांनी मला डिवचले. तिथे असलेल्या एका मुलीने माझ्यावरही वार केले आहेत. मी कोणावर मागून वार केलेले नाहीत, असे गॅरी यांचे म्हणणे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅबानाला मनाई केल्याने तो प्रचंड संतापला. त्याने तो काहीवेळाने पुन्हा तिथे आला, तिथे त्याला आत जाण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे तो तिथेच ताटकळत थांबला. कॅबानाने मागे उभ्या असलेल्या 24 वर्षीय तरुण आणि तरुणीला भोसकले, अशी माहिती पोलिसांनी म्युझिअमचे सुरक्षा व्यवस्थापक यांच्या हवाल्याने दिली आहे.






























































