बनावट पासपोर्ट प्रकरण, तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे यांचा जबाब नोंदवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजप पदाधिकाऱ्याची पत्नी रेश्मा खान हिने बनावट कागदपत्रांच्या आधारे हिंदुस्थानचा पासपोर्ट बनविल्या प्रकरणात मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे यांचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवून घेतला.

रेश्मा खान हिने पश्चिम बंगालमधील बोगस कागदपत्रांच्या आधारे 2012 साली हिंदुस्थानचा पासपोर्ट बनवला होता. 2017 साली मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेच्या आय ब्रँचच्या ही बाब लक्षात आली. त्या ब्रँचचे माजी वरिष्ठ निरीक्षक दीपक कुरूळकर यांनी ही बाब मालवणी पोलिसांना लेखी स्वरूपात कळवून कारवाई करण्यास सांगितले होते. मात्र तेव्हाचे मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक फटांगरे यांनी कारवाई करण्यास चालढकलपणा केला होता. दरम्यान, याप्रकरणी कुरूळकर यांच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटने मालवणी पोलीस ठाण्यात रेश्मा खान, निवृत्त एसीपी दीपक फटांगरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सीआययू युनिट या प्रकरणात दीपक फटांगरे यांचा जबाब नोंदवून घेतला.