
लाकडाची अवैधपणे वाहतूक करणाऱया तीन वाहनांवर वन विभागाने कारवाई केली असून, या कारवाईत संबंधित वाहने व लाकूड असा 14 लाख 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कराडचे वनक्षेत्रपाल टी. डी. नवले व वनरक्षक बी. जी. खटावकर, वनरक्षक यू. एम. पांढरे हे शासकीय वाहनाने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड ते उंब्रजदरम्यान रात्रगस्त करीत असताना, उंब्रज गावच्या हद्दीत एका ट्रकला थांबवून त्याची तपासणी केली असता, रायवळ कापीव मिश्र लाकूड माल 19.983 घनमीटर विनापरवाना वाहतूक करीत असताना सापडला. त्याचप्रमाणे उंब्रज ते पाटण मार्गावर गस्त करताना ट्रकची तपासणी केली असता, वाहनामध्ये 22.36 घनमीटर व आणखी एका ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये 24.596 घनमीटर रायवळ मिश्र प्रजातीचे जळाऊ लाकूड बिगर पासी वाहतूक करताना मिळाले.
वन विभागाकडील वराडे येथील वनरक्षकांनी गुन्हा नोंद करून तिन्ही ट्रक व लाकूड जप्त केले आहे. या कारवाईत एकूण 14 लाख 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सातारचे उपवनसंरक्षक महादेक मोहिते, सहायक कनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.






























































