
मुंबईहून कोकणात जाणाऱया चाकरमान्यांचा प्रवास लवकरच अधिक वेगवान होऊ शकणार आहे. कारण या मार्गावरील कशेडी घाटातील वेडीवाकडी वळणे टाळता येणार आहेत किंबहुना हा घाटमार्गच घेण्याची गरज राहणार नाही. कशेडी घाटाखालून बांधण्यात येत असलेल्या दोन बोगद्यांचे काम वर्षअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे घाटाचे एक तासाचे अंतर टाळून हा प्रवास अवघ्या 10-15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. म्हणजेच चाकरमान्यांना पुढच्या वर्षी एरवीपेक्षा पाऊण तास आधीच कोकण गाठता येणार आहे.
दोन्ही बोगद्यांचे काम डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार.
- दोन्ही बोगद्यांची लांबी 2.40 किलोमीटर.
- बोगद्यांच्या आत 300 मीटरवर छेदमार्ग असून, एकूण 6 मार्गिका.
- बोगद्यांची गटारे, केबल, पथ रस्ता, विजेची कामे सुरू.
- मुंबई-गोवा महामार्ग भोगाव गावच्या हद्दीत सुरू होत असताना 70 मीटरचे 2 पूल मलेशियन तंत्रज्ञान वापरून बांधले जाणार आहे.
- बोगद्यांची उंची 12 मीटर, रुंदी 16 मीटर आहे. फक्त एका बोगद्याचे 235 मीटर काम शिल्लक आहे.
- मुंबईकडून गोवा दिशेने जाणाऱया बोगद्याचे काम 2-3 महिन्यांत पूर्ण होणार.





























































