
अंगडीया खंडणी प्रकरणातील पाहिजे आरोपी उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या अटक पुर्व जामिनावरील सुनावणी आज पुर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आता उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
अंगडीय खंडणी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखा उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेत आहेत. तर अटकेपासून संरक्षण व्हावे यासाठी सौरभ त्रिपाठी यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. आज त्रिपाठी यांच्यासाठी वकिल निकम यांनी युक्तीवाद केला. मात्र वेळेअभावी निकम यांचा युक्तीवाद पुर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे उद्या शुक्रवारी सुनावणी घेण्यात येणार आहे. निकम यांचा युक्तीवाद झाल्यानंतर पोलिस आपली बाजू मांडणार आहेत. दरम्यान, अंगडीया खंडणी प्रकरणात पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालाची एक प्रत देण्यात यावी अशी मागणी निकम यांनी कोर्टाकडे केली. मात्र अजून तपास करणे बाकी असल्याने प्राथमिक चौकशी अहवाल देण्यास पोलिसांनी स्पष्ट नकार दिला.



























































