सौरभ त्रिपाठींच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंगडिया खंडणी प्रकरणातील आरोपी निलंबित डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी आज पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आता उद्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

अंगडिया खंडणी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेचे निलंबित उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांचा शोध घेतला जात आहे तर अटकेपासून संरक्षण व्हावे, यासाठी सौरभ त्रिपाठी यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. आज त्रिपाठी यांच्यातर्फे ऍड. अनिकेत निकम यांनी युक्तिवाद केला. मात्र वेळेअभाकी निकम यांचा युक्तिकाद पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे उद्या शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. निकम यांचा युक्तिवाद झाल्यानंतर पोलीस आपली बाजू मांडणार आहेत. दरम्यान, अंगडिया खंडणी प्रकरणात पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालाची एक प्रत देण्यात यावी अशी मागणी निकम यांनी कोर्टाकडे केली. मात्र अजून तपास करणे बाकी असल्याने प्राथमिक चौकशी अहवाल देण्यास पोलिसांनी स्पष्ट नकार दिला.