
इन्स्टाग्रामने क्रोनोलॉजिकल फीड परत आणण्याचे ठरवले आहे. या फीडमुळे वापरकर्त्यांना त्यांच्या आवडत्या अकाऊंटची नवी पोस्ट सर्वात आधी दिसेल. त्यासाठी इन्स्टाग्राम कंपनी व्हिडीओ आणि फोटो शेअरिंग सर्विससाठी ‘आवडते’ आणि ‘फॉलोईंग’ असे दोन नवीन फीड पर्याय देणार आहे.
इन्स्टाग्रामने सुरुवातीला क्रोनोलॉजिकल फीड युसर्जला दिले होते. मात्र ते अल्गोरिदमिकवर चालणारे होते. यावर युसर्जनी नाराजी व्यक्त केली होती. या फीडमुळे आवडत्या पोस्ट पाहू शकत नाही आणि सतत जुन्या पोस्ट आधी दिसत राहतात, अशी युजर्सची तक्रार होती. त्यानंतर आता इन्स्टाग्रामने क्रोनोलॉजिकल फीड परत आणलंय.
युजर्सना फीड, लाईक आणि फॉलोईंंग असे तीन भिन्न फीड पर्याय दिले जातील. क्रोनोलॉजिकल फीड डिफॉल्ट होम फीड असेल, जे युजर्सला त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या फीडवर अधिकाधिक पोस्ट आणि रिकमेंडेशन देईल.























































