
बॉलिवूडचे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर कबीर लाल हे प्रथमच मराठी सिनेमा दिग्दर्शित करत आहे. अदृश्य या सिनेमातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट येत्या 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
अदृश्य या चित्रपटात मंजिरी फडणीस , पुष्कर जोग हे मुख्य भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासोबत अनंत जोग, उषा नाडकर्णी, अजय कुमार सिंग यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात एका महत्वपूर्ण भूमिकेत रितेश देशमुखही झळकणार आहे. कबीर लाल यांनी दिग्दर्शनासोबत स्क्रीन प्लेची देखील जबाबदारी पार पाडली आहे. साहिद लाल यांनी या चित्रपटाच्या सिनेमॅट्रोग्राफीची धुरा सांभाळली आहे , लवली वर्ल्ड एंटरटेनमेंट या बॅनर खाली चित्रपटाची निर्मिती अजय कुमार सिंह यांनी केली आहे.
कबील लाल यांनी आज पर्यंत ताल , परदेस , कहो ना प्यार है , वेल कम बॅक या सारख्या अनेक हिंदी चित्रपटांच्या सिनेमॅटोग्राफीची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.

























































