नववर्ष शोभायात्रेने मालवण नगरी दुमदुमली; मर्दानी खेळ ठरले आकर्षक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ढोल ताश्यांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, मर्दानी खेळ यासह मोठ्या उत्साहात मालवणात गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेच्या उत्साहाने मालवण नगरी दुमदुमली. मालवण दत्तमंदिर भरड नाका येथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नववर्ष स्वागत यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी मालवणातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मालवण बाजारपेठ येथील प्रत्येक नाक्यावर सादर करण्यात आलेले मर्दानी खेळ नववर्ष शोभयात्रेचे आकर्षण ठरले.