
कोरोनाच्या संकटानंतर बच्चे कंपनीसमोर सामाजिक आणि भावनिक गरजा निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सेसमी वर्कशॉप इंडिया या उपक्रमात सेसमी स्ट्रीट या मुलांच्या कार्यक्रमातील ग्रोव्हर आणि एल्मो या लोकप्रिय पात्रांना घेऊन शॉर्ट व्हिडीओ तयार केले आहेत. हे संदेशपर व्हिडीओ लहान मुलांना सध्या भेडसावणाऱ्या प्रश्नांवर मुलांनी कसे सामोरे जावे यासाठी उपाय सुचवणार आहेत. तसेच मोठी आव्हाने हाताळणे, विचारांना चालना देणे, स्वतःची आणि प्रियजनांची काळजी घेणे अशा अनेक गोष्टी लहान मुलांना शिकवणार आहे. या उपक्रमात पहिल्या टप्पात 5 व्हिडीओची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती समी वर्कशॉपच्या व्यवस्थापकीय संचालक सोनाली खान यांनी दिली.




























































