एसटी कर्मचाऱ्यांचे शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन, चप्पल फेकीचे प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपाचा तिढा गुरुवारी सुटला. मात्र या संपासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जबाबदार असल्याचे सांगत एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने थेट शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक घरावर हल्लाबोल केला. यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक केली, महिला कर्मचाऱ्यांनी बांगड्याही फोडल्या. जे कोर्टाने सांगितलं ते सरकारने आधीच का नाही केलं? असा सवाल यावेळी संतप्त कर्मचाऱ्यांनी केला.