बाप-बेटे तुरुंगात जाणार… कोर्टाने सोमय्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संजय राऊतांचे ट्विट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी तात्काळ एक ट्विट केले आहे. यात बाप-बेटे तरुंगात जाणार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या बाजूच्या कोठडीत राहणार असे ट्विट केले आहे. त्यासोबत त्यांनी एक फोटोही ट्विट केला आहे. ज्यामध्ये ‘आग लगाने वालो को कहां खबर, रुख हवाओं ने बदला, तो खाक वो भी होगे…’ अशा ओळी लिहिल्या आहेत.

सोमय्या यांच्या वकिलाने याबाबतची माहिती दिली आहे. न्यायालयात जाईपर्यंत संरक्षण मिळावे, अटक करण्यात येऊ नये, यासाठी किरीट आणि नील सोमय्या यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. किरीट सोमय्या सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यावरून देखील ते दोघे मेहुल चोकसी सारखे पळून गेले नाही ना, असा संशय संजय राऊत यांनी सकाळी व्यक्त केला होता.