
टँकर गैरव्यवहारप्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषण करण्याचा इशारा दिलेले लोकजागृती सामाजिक संस्थेचे रामदास घावटे आणि बबनराव कवाद यांना पोलिसांनी राळेगणसिद्धीत येण्याअगोदरच अटक केली.
टँकर गैरव्यवहारप्रकरणी राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा देण्यात आल्यानंतर प्रशासनाने तेथे जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. घावटे आणि कवाद यांनी आज राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा दिला होता.
या गैरव्यवहारात अडकलेले कंपनीचे काही पदाधिकारी राळेगणसिद्धीचे आहेत. त्यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि ग्रामसभेने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे गावात जमावबंदीचा आदेश लागू केला असून. कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हजारे यांना ‘झेड’ सुरक्षाव्यवस्था आहे. त्यामुळे अधिक काळजी घेण्यात येत आहे.

























































