जुलैपासून आयआयटीत एमए रिसर्च अभ्यासक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुलै 2022पासून आयआयटी मुंबईमध्ये मास्टर ऑफ आर्टस् रिसर्च प्रोग्रॅम (एमए रिसर्च) हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. दोन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम असून नुकत्याच झालेल्या गेट एक्सएच पेपर, एमएएटी प्रवेश परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारावर या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

संशोधन कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाची मदत होणार आहे. हे कौशल्य केवळ अभ्यासा वेळीच नव्हे तर कामाच्या ठिकाणीही उपयोगात आणता येणार आहे. विद्यार्थी माहितीचे विविध स्रोत एकत्रित करण्यास शिकतील तसेच वाचन, विचार आणि लिखाणात कौशल्य दाखवतील, असे आयआयटी मुंबईच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. जुलै 2022मध्ये सुरू होणाऱया या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना मानव विज्ञान, भाषाशास्त्र्ा, साहित्य आणि कामगिरी आणि समाजशास्त्र्ा या तीन विषयांत स्पेशलायझेशन करता येईल. आयआयटी मुंबईचे संचालक, प्रा. सुभाषिस चौधरी यांनी सांगितले.