
नोकरीसाठी रियाधला जाण्यासाठी जन्म दाखल्यात फेरफार करणाऱयाला सहार पोलिसांनी अटक केली. मिराजुत हक्क असे त्याचे नाव आहे. फसवणुकीच्या गुह्यात त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मिराजुत हा मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. रियाधला जाण्यासाठी तो बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. विमानतळावरील अधिकाऱ्याने त्याच्या कागदपत्रांची तपासणी केली. तेव्हा त्याच्या जन्मतारखेत फरक वाटला. त्यामुळे विमानतळ अधिकाऱयाने त्याची चौकशी केली. तेव्हा फसवणुकीचा प्रकार समोर आला.





















































