
संगमेश्वर तालुक्यातील बावनदीमध्ये परचुरी येथील तरुण बुडाला आहे. सदरची घटना शुक्रवारी दुपारी 4 वाजण्याच्या दरम्यान घडली. एका महिन्याभरापुर्वी याच गावातील दोघांचा बावनदी मध्ये बुडून मृत्यू झाला होता लागोपाठच्या घटनांमुळे गावात शोककळा पसरली आहे.
शिवाजी पांडूरंग लिंगायत (वय 52 वर्षे) हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी सोनगिरी येथे गेले होते. त्या ठिकाणाहून ते गावाकडे परतत होते बावनदीला ओहोटी असल्याने नदीतून पलीकडे येत होते नदीमधून परत येत असताना पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते बुडाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सदरची घटना समजतात संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस सचीन कामेरकर आणि सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचायत समिती उपसभापती परशुराम वेल्येसह ग्रामस्थांनी जाऊन शोध कार्यात मदत केली. संध्याकाळची दरम्याने भरतीला सुरुवात झाल्याने अजूनही बेपत्ता तरुणाचा शोध लागलेला नाही.























































