प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील खुपटी येथे घडली आहे. प्रवीण पावलस ठुबे (वय 30), दीपक प्रकाश घोरपडे (वय 30) अशी मृतांची नावे आहेत. अमोल पावलस ठुबे यांच्या खबरीवरून पोलिसांनी ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे.
अमोल ठुबे यांचा भाऊ प्रवीण आणि दीपक हे दोघे दोन दिवसांपूर्वी प्रवरा नदीत पोहण्यासाठी जात असल्याचे सांगून गेले होते. त्यानंतर दोघेही बेपत्ता होते. आज सकाळी त्यांचे मृतदेह महादेव मंदिर परिसरातील प्रवरा नदीपात्रात तरंगत असल्याचे दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने ते मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद केली आहे. रेवणनाथ मरकड तपास करीत आहेत.

































































