आरटीई प्रवेशास 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेत निवड यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 29 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवड यादीत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत आज 20 एप्रिलला संपली. मात्र अद्यापही बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतलेला नाही. त्यामुळे प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी अनेक जिह्यांतून मागणी करण्यात येत होती.

शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या आरटीई प्रवेशाची ऑनलाइन सोडत 30 मार्च रोजी काढण्यात आली. त्यानंतर 4 एप्रिल रोजी वेबसाईटवर निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. 90 हजार 688 विद्यार्थ्यांना निवड यादीत स्थान मिळाले तर 69 हजार 859 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादीत निवड करण्यात आली.  तसेच 200 दिव्यांग विद्यार्थ्यांनी निवड झाली आहे. यांपैकी अद्यापही अनेक विद्यार्थ्यानी प्रवेशच न घेतल्याने प्रवेशासाठी मुदतवाढ दिल्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले.