
काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी ‘मिशन 2024 साठी’चा फॉर्म्युला तयार केला आहे. यावर अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या काँग्रेस नेत्यांच्या समितीने आपला अहवाल पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर केला आहे. त्यावर सोनिया गांधी अंतिम निर्णय घेऊन प्रशांत किशोर यांची पक्षातील भूमिका निश्चित करणार आहेत.
निवडणुकांतील सततच्या पराभवामुळे काहीसे बॅकफुटवर गेलेल्या काँग्रेसच्या पुनरुज्जीकनासाठी प्रशांत किशोर यांनी एक 600 पानी ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे. त्याचा अभ्यास करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रियंका गांधी-कढेरा, के.सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, पी. चिदंबरम, अंबिका सोनी, जयराम रमेश आणि मुकुल वासनिक या नेत्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने आपल्या निष्कर्षांचा तपशीलकार अहकाल सोनिया गांधी यांना सादर केला.
प्रशांत किशोर यांच्या प्रवेशावरून काँग्रेसमध्ये गोंधळ
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशावरून कॉँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीकेंना कॉँग्रेसमध्ये घेतल्यास कितपत फायदा होईल. पक्षातील त्यांचा सक्रिय वावरामुळे अन्य नेते अस्वस्थ होऊ शकतात. प्रादेशिक पक्षांना फायदा होऊ शकतो असे मत काही नेत्यांनी व्यक्त केले आहे. तर काही नेत्यांनी प्रशांत किशोर औपचारिकपणे पक्षात सामील झाले, तर काही प्रादेशिक पक्षांसोबत असलेले त्यांचे संबंध काँग्रेसला फायदेशीर ठरू शकतात, असे म्हटले आहे.





























































