
पंजाबमधील कॅबिनेटने सोमवारी आमदारांच्या पेन्शनबाबत अधिसूचना जारी केली आहे. आता पंजाबमध्ये आमदारांना एकाच कार्यकाळाची पेन्शन मिळणार आहे. कितीही वेळा आमदार झाले तरीही आता आमदारांना एकाच कार्यकाळाची पेन्शन मिळणार आहे. याआधी पंजाबमध्ये जितक्या वेळा आमदार म्हणून निवडून आल्यावर प्रत्येक कार्यकाळाची पेन्शन मिळत होती. आता यापुढे एकाच कार्यकाळाची पेन्शन मिळणार आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवरील भार कमी होणार आहे.
एखादा व्यक्ती पाच वेळा आमदरा झाला असल्यास त्याला प्रत्येक कार्यकाळानुसार 50 हजार म्हणजे अडीच लाख पेन्शन मिळत होती. आता पंजाबमध्ये आमदारांना प्रतिमहिना 75 हजाराची पेन्शन मिळते. सध्या 325 माजी आमदारांना पेन्शन मिळते. त्यांना एकूण कार्यकाळानुसार पेन्शन मिळते. काही आमदारांना 3.50 लाख ते 5.25 लाखांची पेन्शन मिळते. त्यामुळे पंजाबच्या तिजोरीवर मोठा भार पडत होता. पंजाबच्या कॅबिनेटने सोमवारी आमदारांच्या पेन्शनबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.























































