
राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे आज कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजकीय प्रश्नांपेक्षा विकास कामांवर लक्षं देणं अधिक आवश्यक असून त्यावर आधी बोलू असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विकास कामांची प्रगती सांगितली. यावेळी बोलताना त्यांनी डिसेंबर 2023 पर्यंत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली.
कोस्टल रोड, वरळी शिवडी लिंक, एसटीएचएल असेल हे तिन्ही रोड मुंबईसाठी अगदी महत्त्वाचे आहेत. साधारणपणे आम्ही 2023 पर्यंत हे रोड आम्ही तयार करू शकू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबईसाठी नवीन लँडस्केप तयार होणार आहे. साधारपणे 96 हेक्टर ओपन स्पेस मुंबईसाठी तयार होईल. सायकलींग ट्रॅक, रनिंग पाथ वे हे मुंबईसाठी उपलब्ध होणार आहे.
कोरोना काळात जिथे कुठे उशीर झाला ते लवकर करण्याचे प्रयत्न आम्ही करत आहेत. 2023 च्या डिसेंबर पर्यंत आपण प्रकल्प पूर्ण करू असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
























































