
पूर्ववैमनस्यातून मावस भावावर तलवारीने वार करुन दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी रात्री येरवडा गाडीतळ परिसरात घडला. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
निसार युसुफ शेख, रमजान साहील शेख ,आणि नवाब निसार शेख ( तिघे रा. गाडीतळ, येरवडा) यांच्याविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत इब्राहिम मुबारक शेख (वय 33, रा. येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान शेख हा इब्राहिम यांचा मावस भाऊ आहे. उभयतांमध्ये जुनी भांडणे आहेत. इब्राहिम व त्यांचा भाऊ महंमद जबी शेख हे बुधवारी रात्री 11.30 वाजता गाडीतळ येथील दुर्गामाता मंदिराजवळ थांबले होते. त्यावेळी तिघा आरोपींनी त्यांच्यावर तलवारीने व लोखंडी पाईपने हल्ला केला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येरवडा पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




























































