इन्स्टाग्रामवर मेसेज करून मैत्री, अपहरण, बलात्कार… अल्पवयीन मुलीवर गुदरला भयंकर प्रसंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्स्टाग्राम किंवा फेसबुकसारखी अॅप्लिकेशन जपून वापरा असं आवाहन वारंवार करण्यात येतं. त्याकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. अशीच एक गंभीर घटना दिल्लीतील अल्पवयीन मुलीसोबत घडली आहे.

सोशल मीडियावरून झालेल्या मैत्रीचा एक भयंकर परिणाम पीडित मुलीला भोगावे लागले आहेत. एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीशी इन्स्टाग्रामवरून आरोपीने मैत्री केली होती. त्याने पीडितेला भेटायला बोलवलं होतं. पीडिता आरोपीला भेटायला दक्षिण दिल्लीच्या वसंत कुंज परिसरात गेली होती. आरोपीने पीडितेचं अपहरण करून तिला दोन दिवस बंदी बनवून ठेवलं. त्या दरम्यान तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तिच्या अपहरणानंतर पोलिसांनी तिच्या सोशल मीडियावरून पोलिसांनी शोध घेतला.

आरोपीला सोशल मीडियाचं व्यसन आहे. त्यामुळे तो वेगवेगळ्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत असे. त्यानंतर त्यावर येणाऱ्या कमेंट्सवरून तो मुलींशी संपर्क साधत असे. तिच पद्धत वापरून पोलिसांनी त्याचा शोध घेतला. सोशल मीडियावरील त्याच्या लोकेशनवरून त्याला अटक केली. आरोपीने अनेक मुलींना लग्नाचं वचन देऊन फसवलं असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानुसार शोध सुरू करण्यात आला आहे.