
महाराष्ट्रात काय प्रश्न आहेत आणि ते कसे सुटू शकतात हे महाविकास आघाडीने कामातून दाखवून दिलेय. पण काही लोक केवळ जातीय तेढ निर्माण करीत आहेत. पावसाळ्यातील छत्र्यांसारखे हे लोक उगवता. भोंगे यांना अगोदर दिसले नाहीत का, जागरण, गोंधळ आणि भजन कीर्तनही रात्री उशिरा उशिरापर्यंत चालतेच, अशा वेळी केवळ वातावरण बिघडविण्यासाठीच विधाने केली जात असल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना लगावला.
सातारा तालुक्यातील वाढे गावातील एक कोटी रूपयांच्या विविध विकास का https://stock.adobe.com/ मांचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी विरोधकांवर टीका करताना अजित पवार यांनी राज ठाकरे यांचाही समाचार घेतला. केवळ प्रसिद्धी आणि नावासाठी छोटी माणसे शरद पवार यांच्यावर टीका करतात. महाराष्ट्रातील वातावरण बिघडले तर मोठे गुंतवणूकदार आणि उद्योगपती दुसऱया राज्यात जातील, त्यामुळे राज्याचे नुकसान होईल. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या भावाबद्दल कोण बोलत नाही; परंतु इतर गोष्टींवर बोलून राज्यातील वातावरण बिघडवण्याचं काम केले जात आहे.


































































