
दरदिवशी सोशल मीडियावर गमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. एका व्यक्तीसोबत प्लास्टीकच्या खूर्चीवर व्यायाम करताना असे काही घडले की लोकं व्हिडीओ पाहून लोटपोट हसू लागले.
सोशल मीडीयावर एक व्यक्ती व्यायाम करताना दिसत आहे. आधी तो गार्डनमध्ये एक खूर्ची आणून ठेवतो. त्यानंतर तिथे आपले व्यायामाचे साहित्य आणून ठेवतो. बॉडी बिल्डरसारखा वाटणारा हा व्यक्ती त्या खूर्चीवर बसून बेंच प्रेस एक्ससाईज करायचा विचार करतो. जसा तो खूर्चीवर बसून वजन उचलून थोडा मागे झुकतो आणि खूर्ची तुटून जाते आणि ती व्यक्तीही जबरदस्त खाली पडते. नेटकरी या व्यक्तीची बुद्धीमत्ता पाहून लोटपोट हसत आहेत.
View this post on Instagram
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक ठिकाणी शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून हसणं थांबले नाही तर काही लोकांनी त्या व्यक्तीबाबत काळजी व्यक्त केली. पण ही गोष्ट खरीय की त्या इसमाला खूर्चीवर व्यायाम करणे भारी पडले आहे. या इसमाला खूर्चीवरुन पडल्यावर दुखापत झाली की नाही याबाबत माहिती मिळालेली नाही.





























































